ओळी

श्वास  जड …..श्वास  हलका …धडधड  मात्र  जोरात ,
सळसळती वीज , निवलेला  आत्मा , नजर  अंतराळात ;
.
.
.
अद्वैताच्या  वाटेवर , तू  माझ्यात , … मी  तुझ्यात !
********************************************

मान्य, अमान्य, सतराशे साठ बंधने,
त्यांना वाटून संपले, काळाचे साखरफुटाणे
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे

******************************

कशाला व्हायचे सैरभैर, अमावास्येला,
चंद्रासाठी…..
दिसला जरी नाही तरी, असतो तो
तिथेच!

*****************************

रात्रभर पाउस
माती ओली हळवी
सोसेना प्राजक्ताचा सडा

*****************************

तनामनातला जिप्सी  प्रदक्षिणा घालतो
पायाशी समुद्र अन शिखरं निरखत राहतो
डोळे मिटताच समोर विठू उभा ठाकतो

*****************************

प्रेम इतके हलके नसावे, पिसासारखे,
फुंकर मारली अन उडून जावे,
प्रेम इतके कठीणही नसावे, खडकासारखे,
ओझ्याखाली पिचून जावे,
प्रेम इतके सोपेही नसावे, गाण्यासारखे,
कुणीही कधीही कसेही करावे,
प्रेम नसावे देवावरच्या भाक्तीसारखे,
डोळे मिटून स्वस्थ बसावे,
प्रेम इतके रुक्ष नसावे, गणितासारखे,
द्यावे घ्यावे अन संपून जावे,
प्रेम नसावे विस्तावातल्या निखार्यासारखे,
चटका बसताच विझवून टाकावे,
प्रेम इतके कोमल नसावे फुलासारखे,
झळ लागताच सुकून जावे,
प्रेम इतके दुर्गाम्ही नसावे हिमालयासारखे,
नमस्कार करून पायथ्याशीच राहावे,
प्रेम  असावे समुद्रासारखे  ,
किनार्यांशीच भांडत राहावे …..
प्रेम असावे जुगरासारखे,
हरलो तरीही खेळतच राहावे ….
प्रेम असावे महापुरासारखे,
सगळे काही ग्रासून घ्यावे ….
प्रेम असावे सूर्यासारखे,
मावळून पुन्हा उगवत राहावे…….

– Kavita ….

******************************

एक भावानुवाद:

ना आस्तिक वा पांथिक, ना पवित्र वा पतित मी,
ना कुणी संत, ना कुणी राजा, आहे मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ग्रंथात अन भांगेतही  सापडत नाही मी,
दारूच्या धुन्दीतही जाणवत नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना सुखदु:खाच्या सोहळ्यात, ना पूजेत रमतो मी,
हवा, पाणी, आग अन जमीन, यातही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
ना देशाविदेशात, ना भाषा प्रांतात वसतो मी
या इथल्या ठिकाणीही रहात नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
धर्माचे गूढ अन माणसाचे मूळ, जाणत नाही मी,
चालतीफिरती उठतीबसती, व्यक्तीही नाही मी,
बुल्ला, काय माहीत, कोण मी?
सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आहे फक्त मी,
माझ्या जाणीवेतून, आहे ‘ज्ञानी’ फक्त मी,
बुल्ला, समोर ठाकलो आहे का मी?
****************************************


 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: