सबला

‘स्त्री आणी तिची मुक्ती’ अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय.
माझी आजी. तिचा ‘स्त्रीमुक्ती’ या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे ‘डायरेक्ट मोक्ष’ हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा.
त्यामुळे तिने ना कधी पुरुषांना शत्रू मानले , ना स्त्रियांना. .
……………………………………….

तशी ती मुक्त कधीच नव्हती, पण ती ‘बद्ध’ पण नव्हती.
तिनी कधीही पैसे कमावले नाहीत, पण त्यामुळे ती कधीही दीनवाणी झाली नाही.
तिच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तिच्या तोंडून कधीही कुणीही ‘कंटाळा’ हा शब्द ऐकला नाही.

तरी तिच्या एका स्त्रीयांना उद्देशून केलेल्या कवितेतल्या ओळी मला लहानपणी नेहमी खटकायच्या,

जात तुझी चंदनाची, असे झिजू दे ग अंग,
सये! मांडिलीस पूजा, होऊ देई यथासांग …..

जे जे समोर येईल त्याला तोंड देणे, ते मनापासून, उत्तम करणे हे तिला पक्के माहित होते.
तिच्या अशा मृदू आणि लढाऊ अशा दोन्ही गुण दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की तिनी स्वत:ला पूर्ण ओळखलेले होते, ती कशी आहे, तिला स्वत:ला काय हवय, ती काय करू शकते आणि तिच्या आणि तिच्या संसारातल्या सर्वांच्या संपन्न आयुष्यासाठी तिनी काय करायला हवय याची तिला पूर्ण जाण होती. तिनी तिचे चंदनाचे गुण पूर्ण ओळखले होते.
त्याच कवितेतल्या शेवटच्या ओळी होत्या,

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे ‘मी’ पण ना सोडी!

एक स्त्री म्हणून नैसर्गिकरीत्याच व समजव्यवस्थेचा भाग म्हणून, जमवून घेणे, कष्ट करणे, दु:ख सोसणे या गोष्टी वाट्याला येणार हे तिनी गृहीत धरले होते. पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते.कुणासाठीही काही करताना ती नोकर, आया वगरै नसायची, ती ‘दात्री’ होती! ती ”सबला’ होती!

—Kavita….

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: